Homeराजकीयवाघ्रुळ जहागीर गटातून भाजपाचे डॉ. अनिल सरकटे मैदानात उतरण्याच्या हालचाली.

वाघ्रुळ जहागीर गटातून भाजपाचे डॉ. अनिल सरकटे मैदानात उतरण्याच्या हालचाली.

उमेदवारीसाठी डॉ. अनिल सरकटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागनी.

गिरीराज गिराम {मुख्य संपादक-दिव्य मराठवाडा}

वाघ्रुळ जहागिर गटातून उमेदवारीसाठी डॉ. अनिल सरकटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत उमेदवार अर्ज केला.

आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चे बांधणीला सूरूवात झाली आहे. जालना तालूक्यात येणारा वाघ्रुळ हा गट यंदा अनूसूचित जातीसाठी सुटल्याने भाजपाकडून या ठिकाणी अनुसूचित जाती मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल सरकटे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. वाघ्रुळ गटातून पक्षाने संधी द्यावी अशी मागनी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

जालना तालुक्यातील ९ गटापेक्षा महत्वाचा असलेला वाघ्रुळ जहागिर गटातून भाजपाचे डॉ. अनिल सरकटे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मैदानात उतरण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांची ओळख असून पक्षांतर्गत चर्चांना यामुळे रंग चढत असल्याचे दिसत आहे.वाघ्रुळ गट हा अनूसूचित जातीसाठी राखीव असल्याने या गटातून डॉ. सरकटे हे इच्छुक उमेदवार म्हणून सक्रिय झाले आहेत. दरम्यान, सरकटे यांचा पूर्वीचा प्रभाग असलेला पिरकल्यान गट महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांनी वाघ्रुळ गटाची दिशा घेतल्याचे बोलले जात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पिरकल्याण गटातून अत्यंत निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यंदा मागील पराभवाचा वचपा काढण्याची तयारी त्यांनी केली होती. परंतु पिरकल्याण गट महिलेसाठी राखीव झाल्याने त्यानी वाघ्रुळ गटातून तयारी सुरु केली आहे. डॉ. अनिल सरकटे हे सध्या भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तसेच नाव्हाचे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular