Homeराजकीयजालना महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. - मा. आ. संतोष सांबरे

जालना महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा. – मा. आ. संतोष सांबरे

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्जाचे वाटप कार्यक्रमास कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद

प्रतिनिधी |जालना

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महानगर पालिका निवडणूक संदर्भात बैठक अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न, इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद.

जालना शहर महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील 16 प्रभागाच्या 65 जागेसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारीच्या अर्जाचे वितरण करण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रभागातून लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत मागील अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने जनतेनी शिवसेना पक्षाला भरभरून पाठिंबा दिला आहे. अनेक वर्ष जालना नगर पालिकेत शिवसेनेची सत्ता होती आजची राजकीय परिस्थिती जरी वेगळी असली तरी मा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग या शहरात आहे व मा उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान करणार आहे. या करिता उमेदवारांनी घरा घरात जाऊन आपले विचार जनते पर्यंत पोहोचवावे व जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी होवून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या सोबत जिल्हासंघटक भानुदास घुगे, उप जिल्हाप्रमुख रमेशराव गव्हाड, दीपक रणनवरे, माजी नगरसेवक गणेश घुगे, युवा सेना विस्तारक भरत सांबरे , युवा सेना शहरप्रमुख दर्शन चौधरी संदीप झारकंडे, डॉ राजेश राऊत,तुळशीराम काळे, राधेश्याम विजयसेनानी यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात इच्छुकाची गर्दी दिसून येत आहे. शहरात सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेची व्यवस्था संपूर्ण कोलमडलेली आहे. जालना शहरात पाणीपुरवठा वेळेवर होत नाही, शहरात मोकाट कुत्र्याचा वावर वाढलेला असून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, यामुळे शहरातील जनता त्रस्त झालेल्या असून सत्ताधारी पक्षाला जनता नकार देणार आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजूने जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक विजय होऊन महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल त्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या वार्डात पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार आणि प्रसार करून शिवसेना उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन माजी आमदार संतोष सांबरे यांनी यावेळी बोलताना केले. या प्रसंगी भानुदास नाना घुगे, रमेशराव गव्हाड, दीपक रणनंवरे,गणेश घुगे आदीनी सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी आशा व्यक्त केली,यावेळी बाबासाहेब पाखरे, विठ्ठल पाऊलबुद्धे, प्रताप भगत, गणेश ढवळे, अंकुश साळुंखे, सुरेश राजपूत, अभिजीत धुळे, रोहित टोपले, गणेश गोरक्षक, प्रकाश राजपूत , अशोक साळुंखे, विशाल ढवळे, राजेश ढवळे, आरशत शेख, अरबाज पठाण, अमित दागडिया, तुकाराम भुतेकर, रहीम खान, आंबेश विजयशेनानी, राधेश्याम विजयसेनानी, सुनील सुपेकर, संतोष क्षत्रिय, अनिल अंबोरे, अमोल घुगे, अजय रोडीया, गजेंद्र सुपेकर, बबनराव मिसाळ, आदींची उपस्थिती होती

RELATED ARTICLES

Most Popular