HomeNewsवखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची...

वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

प्रतिनिधी|सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील वखारी येथील ज्ञानतीर्थ इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य अण्णाभाऊ भालमोडे,ज्येष्ठ शिक्षक शंकर सांगळे,अर्चना मेहेत्रे,संस्थेच्या उपसचिव विद्या खैरे,उपाध्यक्ष माया भालमोडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्राचार्य अण्णाभाऊ भालमोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की ज्ञान हाच खरा मार्ग आहे,आणि शिक्षण हेच खरे परिवर्तन आहे.३जानेवारी हा केवळ एक दिवस नाही,तर सामाजिक न्यायाचा संकल्प दिवस आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अंधारात ज्ञानाचा दिवा पेटवला त्यांनी अपमान,अन्याय आणि संघर्ष सहन करूनही शिक्षणाची वाट सोडली नाही.आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.त्यांचे जीवन आपल्याला एकच शिकवण देते शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि शिक्षणाशिवाय मुक्ती नाही.सावित्रीबाई फुले यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते.त्यांनी समाजातील अनेक वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवला. बालवि‌वाह,सतीप्रथा जातिभेद स्त्रियांचे शोषण या विरोधात त्यांनी निर्भीडपणे भूमिका घेतली.विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले.

अनाथ व गर्भवती विधवांसाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले.या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी सुध्दा आपली मनोगते व्यक्त केली.हा कार्यक्रम यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षक शंकर सांगळे,अरुण काळे,मोहम्मद मारुफ खान,अरविंद राऊत,विजय बोरुडे,हरिष खराडे,भगवान खरात,अशोक पाटोळे,अर्जुन यशवंते,लक्ष्मण लोखंडे, विशाल डोंगरे,गणेश कुदळे,संदिप लिहिणार,ज्ञानेश्र्वर गायके,सागर झोटे,गणेश खैरे,विद्या खैरे,माया भालमोडे,अर्चना मेहेत्रे,सिंधु घोलप,सरस्वती गिराम, करुणा लांडगे,गिता शिंदे,निदा काझी,त्रिवेनी दसरे,अर्चना जाधव,स्वाती ठाकरे,पुष्पा राऊत,सोनु वाजगे,ऐश्वर्या पुंड,शायनी जोसेफ,रीचा भोजने,कांचन बिबिकर,पूनम राजमाने,अनिता चौधरी,वर्षा तायडे,कोमल धोकडे,शामल तारख,समृद्धी बोरुडे,आरती कोळे,शितल ठाकरे,विद्या बर्डे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन ऐश्वर्या पुंड यांनी केले तर आभार हरिष खराडे यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular