प्रतिनिधी|जालना
जालना तालुक्यातील रामनगर येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक खुशालराव दामोदरराव शिंदे (उटवद) यांनी राम कृष्ण हरी नामाचा एक कोटी जप पूर्ण केल्यानिमित्त त्यांचा सत्कार व पूजन करण्यात आले.

वेदांताचार्य ह. भ. प. गणेश महाराज कोल्हे (रामनगर) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.यावेळी माजी सरपंच प्रल्हादराव खुशालराव शिंदे उपस्थित होते. खुशालराव शिंदे यांचा परमार्थ हा अंतरंगातील असून, हरिपाठातील “ठायीच बैसोनि करा एकचित, आवडे अनंत आळवावा” या भावनेप्रमाणे त्यांनी अखंड नामस्मरणाची साधना केली, असे यावेळी सांगण्यात आले.नामजपाच्या या तपश्चर्येमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.






