
प्रतिनिधी|जालना
गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण जालना चौधरीनगर येथील संत सेवालाल महाराज मंदिर या ठिकाणी आले होते.यावेळी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संदेश चव्हाण म्हणाले की गोरसेना ही संघटना महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात काम करीत आहे.या संघटनेचे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यामध्ये शाखेचे विस्तार या पूर्वी झाले आहे.तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये गोरसेनेचे सुशिक्षित सक्षम उमेदवार उभे केले जाणार आहे.त्यानिमित्त ते जालना येथे आले होते. व समाज बांधवांशी विविध विषयावर चर्चा केली आहे.यावेळी गोरख पवार,संताराम पवार,लहु चव्हाण,विकास चव्हाण व ईतर काही समाज बांधव उपस्थित होते.






