HomeNewsरस्त्याच्या कामासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे व आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन

रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे व आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन

प्रतिनिधी|जालना

जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव ते माळाचा गणपती दरम्यान जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोमवार दि.26 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर आणि पालकमंत्री पंकजाताई मुंढे आणि जिल्हा प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिले आहे.दरम्यान या गावाच्या रस्त्यासाठी गावकर्यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.शाळेतील मुलांना,गरोदर महिलांना,वृध्द नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे गावच्या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी गावकर्यांनी केली.सामाजिक कार्यकर्ते अमोल खरात यांच्या सह गावातील नागरिक मोकिंद खरात,पिराजी खरात,बद्रीनाथ वाढेकर,राजू खरात,राहुल खरात,गोविंद खरात,अशोक सोमधाने,शरद खरात,राहुल रामभाऊ खरात,व्यंकटेश गंडाळ,आकाश सोमधाने,यांची उपस्थिती होती.निवेदनावर प्रभारी सरपंच गणेश डोईफोडे,उपसरपंच देविदास सोमधाने,ग्रामसेवक राहुल सातपुते,यांच्या सह गावातील विलास खरात,सिद्धार्थ गवई,पद्माकर खरात,नंदू खरात,बाबासाहेब खरात,बाकीलाल सरकटे, उत्तम खरात,विशाल बाजीराव गवई,कचरु खरात,कैलास सोमधाने,उमाजी येवले,सिद्धेश्वर डोईफोडे,कपिल म्हस्के,हिरालाल खरात,मिलिंद खरात,वैभव खरात,महेंद्र खरात,आत्माराम खरात,भिकुलाल खरात,संदीप काकडे,संतोष वाहुळे,रतन खरात,सुरेश खरात,सदानंद शिंदे,दिपक म्हस्के,अनिल गवई,स्वप्नील खरात,अनुराग खरात,शरद वढेकर,अजय वाढेकर,नितीन वाढेकर आदींच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular