
शाम गिराम |सिंधी काळेगाव
मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. याच विषयी जनजागृती करण्यासाठी व क्रांतीसुर्याचे विचार सर्वांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये फुले फेस्टिवल ची सुरुवात कवी गझलकार आदरणीय विजय वडवेराव यांनी केली. यावर्षीचा फुले फेस्टिवल पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात दिनांक २ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित आहे. या फेस्टिवल मध्ये देश विदेशातील शेकडो कवी,कवयित्री,साहित्यिक, कलाकार सहभागी होत आहे.या नामांकित अंतराष्ट्रीय फुले फेस्टिवलच्या अध्यक्षपदी जालन्याचे कवी, कथालेखक, नाटककार , कामगार संघटना अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाची छाप निर्माण करणारे भानुदास सुखदेव शेवाळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शेवाळे हे महावितरण मधील कर्मचारी असून या अगोदर त्यांना महावितरणचा गुणवंत कामगार पुरस्कार,कामगार कल्याण मंडळाने घेतलेल्या राजस्थरीय काव्य संमेलनात त्यांचा कामगार मंत्र्यांच्या हस्ते गौरव झाला आहे.आयोजक वडवेराव हे फुले फेस्टिवल च्या माध्यमातून क्रांतिसूर्य महात्मा फुलेंच्या विचाराच्या प्रचार प्रसाराचा ध्यास घेऊन मागील एक तपावून अधिक काळापासून भिडेवाड्याच्या विषयी जागरण कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हे सुप्रसिद्ध कवी, गझलकार व शिक्षक आहे. या सोबतच त्यांचे कार्य पाहून लोकांनी त्यांना ‘भिडेवाडकार ‘ या उपाधीने गौरवले. त्यांचे “मी बोलतच त्याने हंबरडा फोडला” या अजरामर गीताने भिडेवाड्याच्या अंतकरणाचा टाहो सर्वांपर्यंत पोचविण्याचे कार्य मोठ्या धडाडीने करत आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या कार्याच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. या सोबत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ विचार आणि लेखणीतून साकारलेल्या भारतीय संविधानाचा जागर सुध्दा करत आहे.

नुकताच त्यांचे नाव संविधान जागरणासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. या नामांकित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी जालन्यातील चिखली सारख्या छोट्याशा गावातील व्यक्तीच्या झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहेत.







