Homeराजकीयऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे आमदार हिकमत दादा उढाण यांचा सत्कार.

ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे आमदार हिकमत दादा उढाण यांचा सत्कार.

हिवाळी अधिवेशनात आरक्षणाची मागणी मांडल्याबद्दल सत्कार

घनसावंगीचे लोकप्रिय आमदार डॉ. हिकमत दादा उढाण यांची सत्कार करताना पदअधिकारी.
( छायाचित्र – दिव्य मराठवाडा)

प्रतिनिधी | जालना

घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. हिकमत दादा उढाण यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघ (AIBSS) जालना जिल्हा शाखेच्या वतीने भेट घेऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनात वंजारी, बंजारा व धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील समावेशाबाबत त्यांनी सभागृहात ठाम भूमिका मांडल्याबद्दल संघटनेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी AIBSS चे जालना जिल्हाध्यक्ष चेतन भाऊ राठोड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजाच्या हक्कांसाठी आमदार उढाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत पुढील काळातही अशीच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.या भेटीमुळे AIBSS च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या प्रश्नांसाठी संघटना अधिक सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमदार हिकमत दादा उढाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत समाजन्यायासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. “हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular