शाम गिराम|सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील पिरकल्याण सर्कल पंचायत समिती उमेदवारीसाठी ब्राम्हण खेडा येथील नागेश दतात्रय डवले यांनी १ डिसेंबर रोजी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दाखल केला.नागेश डवले यांनी माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर व शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर व युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या आशिर्वादाने इच्छुक फॉर्म भरलेला आहे.पिरकल्याण सर्कल आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी नागेश डवले यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत अर्ज दाखल केला आहे.शिवसेनेने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविल्यानंतर नागेश डवले यांनी पुढाकार घेत अर्ज सादर केला आहे. तसेच पक्ष मला संधी देईल असा विश्वास नागेश डवले यांनी व्यक्त केला.शिवसेनेकडून उमेदवारी अर्जाची मागणी होताच नागेश डवले यांनी दाखल केलेल्या या अर्जामुळे पिरकल्याण सर्कल मधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.पिरकल्याण सर्कल मधून नागेश दत्तात्रय डवले यांनी शिवसेना या पक्षाचा पिरकल्याण गण पंचायत समिती साठी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष मोहिते,बाबा मामा मोरे,कमलाकर कळकुंबे, रमेश चांदर,माऊली डोंगरे,वसंतराजे जाधव,बंडुराजे जाधव, गणेश थेटे, रमेश जाधव चेरमन, भगवान दाजि शिंदे ,प्रकाशतात्या शिंदे, सोनाजी भुतेकर ,राम सर एखंडे, प्रदिप एखंडे,नकुल भुतेकर,अंकुश इंगोल, संतोष राठोड,ब्रम्हानंद कदम,विठ्ठल एखंडे,शिवराम तौर,विठ्ठल एखंडे,प्रमोद शिंदे,संदिप घारे, सलमान कुरेशी वैभव उगले,मनिष तनपुरे, गणेश भुतेकर,आणि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.आगामी काही दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून अंतिम उमेदवाराचा निर्णय जाहीर होणार असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसुन येत आहे.






