सिंधी काळेगाव परीसरात कपाशी उपटून रब्बीची तयारी.

सिंधी काळेगाव परीसरात रब्बीची तयारी.

0
95
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: null; delta:null; bokeh:0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 41;

शाम गिराम| सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव परीसरात कापसाच्या दोन वेचण्यातच कापसाचा खुराडा झाला आहे.त्यामुळे शेतकरी कापसाची फरदड न घेता कपाशी उपटून त्या शेतात गहू, हरभरा, ज्वारी सह विविध पिके घेण्यासाठी शेत तयार करत आहे. सध्या कपाशी काढण्याच्या अगोदर मेढ्या बसवताना दिसत आहे. त्यामुळे जमीनाला पेरणीच्या अगोदर शेनखताचा ढोस सुद्धा मिळत आहे.त्यामुळे रब्बीच्या पेर्यात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

सिंधी काळेगाव परीसरात या वर्षी परतीच्या पावसाने मोठे नूकसान केले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कपाशीच्या वाती झाल्या. आता कपाशीला कैर्या नसल्याने कपाशी उपटून त्या ठिकाणी गव्हाचे पिक घेणारआहे.

-राम गिराम शेतकरी, सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील ग्रामीण भागात या वर्षी शेती व्यावसाय मोठ्या अडचनीत सापडत आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लावण्या पेरण्याचे काम उरकून घेतली होती. जेमतेम पावसावर पिके जगली होती. फिका योग्य पाऊस होत गेल्याने पिके छान आली होती. अनेक वर्षाचे नूकसान या वर्षी भरून निघेल अशी आशा शेतकर्याना होती. परतु सप्टेंबर मध्ये झालेल्या ढगफूटी दूष्य पावसाने शेतातील मुग, उदीड, सोयाबीनसह कपाशीचे मोठे नूकसान केले. मोठा खर्च करून नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. परतीचा जोरदार पावसाने खरीपाच्या पिकाचे नुकसानी बरोबरच रब्बीच्या पेरण्यासूद्धा लांबणीवर पडल्या होत्या. शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पेरण्या महिन्याभराच्या उशिराने होत आहे. त्यामुळे शेतकरी आता कमी कालावधीत येणारे पिके घेण्याकडे भर देताना दिसत आहे. कपाशीला कैर्या नसल्याने शेतकरी कपाशी उपटून पेटून देत आहे.