
प्रतिनिधी|जालना
प्रमोद मोतीराम भोसले यांनी औषधनिर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय “डिसाईन, डेव्हलपमेंट अँड एव्हलूशन ऑफ नॅनोसपेन्शन बाय एनहासिन्ग बायोअविलंबलिटी ऑफ पूर्वली सोल्युबल ड्रग” असा आहे. या संशोधनाला डॉ. मनमीत सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाचे शोधप्रबंध 30 जानेवारी रोजी सनराईज युनिव्हर्सिटी, अलवर (राजस्थान) येथे सादर केले, असता विद्यापीठाने त्याना फार्मसी मधील सर्वोच्च डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D) ही पदवी प्रदान केली.
या संशोधनामध्ये कमी विद्राव्यता असलेल्या औषधांची जैवउपलब्धता वाढवण्यासाठी नॅनोसस्पेन्शन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात आला असून, हे संशोधन औषधनिर्मिती क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे औषधांची कार्यक्षमता वाढून रुग्णांना अधिक परिणामकारक उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
प्रमोद भोसले यांच्या या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, मार्गदर्शक, मित्रपरिवार व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.






