जालना शहरतील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही नावे जाहीर करा – संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर.

शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी पिडीट कुटुंब्याची भेट

0
81

प्रतिनिधी|जालना

जालना शहरातील दत्तनगर येथे हर्शल मोटवानी व सौरभ मोटवानी यांना काही अज्ञात समाजकंटकांनी क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याचीन घटना नुकतीच घडली. या घटनेची माहिती कळताच शिवसेना संपर्कप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह मोटवानी त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली व अत्यंत भयभीत झालेल्या मोटवानी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी यांच्यासोबत माजी शहरप्रमुख बाला परदेशी, नगरसेवक दुर्गेश काठोटीवाले, योगेश भगत, दीपक राठोड, अर्जुन गेही, माजी शहरप्रमुख घनशाम खाकीवाले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालना शहरातील वाढत्या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी त्यांना संरक्षण देणाऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी करतांना म्हणाले की, शहरात गुंडांना कायद्याचा धाक राहिला नाही. पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर लगेच त्यांना सोडवण्यासाठी त्यांचे रक्षणकर्ते तेथे हजरच असतात. अशा गुंडांना पाठबळ देणाऱ्या रक्षण कर्त्यामुळे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करिता गुन्हेगारांचे संरक्षण करणारे राजकीय अथवा अराजकीय कोणीही असोत त्या व्यक्तींची नावे जाहीर करावीत जेणेकरून गुन्हेगारांना नेमके कोण पाठबळ देते हे जनतेला कळेल.

जालना शहर हे गावठी कट्ट्यांचे केंद्र बनले आहे. अनेकांचे यामुळे निष्पाप बळी गेले आहेत. तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहे. नशेच्या गोळ्या खाऊन शहरात दहशत निर्माण केली जात आहे. अशा गुंडांना कायद्याची भीती वाटत नाही. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून चौका-चौकात असे गुंड झोडपून काढले पाहिजेत. जेणेकरून सामान्य नागरिकांच्या मनातील भीती त्यामुळे दूर होईल. जालन्यात नूतन पोलीस अधीक्षक आल्यापासून मात्र नागरिकात एक आशावाद निर्माण झाला आहे. तरुण मुली, महिला, व्यापारी व सामान्य नागरिक यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे भास्करराव अंबेकर म्हणाले. दरम्यान दत्तनगर येथील जखमींची विचारपूस करतानाच माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांना दूरध्वनीवरून सविस्तर माहिती दिली. ते अधिवेशना निमित्त मुंबईत असल्याने जालन्यात आल्यावर पोलीस अधीक्षकांची शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी सांगितले.