प्रतिनिधी |जालना
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसा1ठी मनसेने जालना तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे जालना तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवारी देणार असल्याची माहिती मनसेचे जालना तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे यांनी दिली. या बाबद ते म्हणाले कि, जिल्हा परिषदेसाठी ९ जागा आणि पंचायत समितीसाठी तब्बल १८ जागा लढविणार आहे. दरम्यान, विरेगाव पंचायत समिती गणातून कृष्णा खलसे हे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची अशी अधिकृत माहिती स्वतः खलसे यांनी दिली.मनसेच्या या हालचालीमुळे तालुक्यातील निवडणूक रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध गावांमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संघटन मजबूत करण्याच्या हालचाली वेगाने करत आहेत.स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून विकासकामे रखडली असल्याने मतदारांमध्ये सध्या बदलाची भावना निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मनसे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवर उमेदवारी देत असल्याने खलसे यांनी सांगितले.




