प्रतिनिधी |सिंधी काळेगाव

मुंबई येथे झालेल्या सहाव्या मास्टर वेलकप नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोहेकॉं. भरत ढाकणे यांचे सुपुत्र आर्यन ढाकणे आणि त्यांच्या संघाने सुवर्णपदक पटकावले आहे.मुंबई येथे झालेल्या सहाव्या मास्टर रॉयल कप नॅशनल लेवल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्याचे द अल्टिमेट वॉरियर मिक्ष मार्शल आर्ट असोसिएशन जालना या संघाने यश मिळवले असून सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जालना सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल भरत ढाकणे यांचे सुपुत्र आर्यन ढाकणे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकावले आहे. पदक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – आर्यन भरत ढाकणे काता आणि कुमितेमध्ये सुवर्णपदक, ईश्वर ज्ञानेश्वर शेजुळ कुमीतेमध्ये सुवर्णपदक आणि कातामध्ये आरोग्य पदक, तसेच पियुष बलवीर सिंग राणा या विद्यार्थ्याचे कुमते आणि कातामध्ये रोपे पदक मिळवले आहे. विजयी संघासह प्रशिक्षकांचे जिल्ह्याभरातून त्यांचे कौतुक होत आहे.






