
प्रतिनिधी|सिंधी काळेगाव
पात्र दिव्यांगांना पुणे आयुक्तालयाने यूडी आयडी कार्ड म्हणजे (वैश्विक कार्ड) केंद्र सरकारच्या योजना व महाराष्ट्र शासनाच्या योजना दिव्यांगांना सुलभ आणि गैरसोय होऊ नये यासाठी पुणे आयुक्तालयाने पात्र दिव्यांगांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून युडी आयडी ( वैश्विक कार्ड) कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून समाज कल्याण कार्यालय मार्फत वितरित करण्यात आले आहे
पण दिव्यांगांना प्रवासादरम्यान पात्र असून सुद्धा राज्य परिवहन महामंडळाकडे त्यांच्याकडे असलेले ॲप स्कॅन होत नाही म्हणून काही दिव्यांगांना राज्य परिवहन महामंडळाकडून सवलत नाकारली जात आहे फुल टिकीट घेतले जात आहे हे यूडीआयडी कार्ड पात्र दिव्यांगानाच देण्यात आलेले आहे यामुळे
पुणे आयुक्तालाचा आवमान असून दिव्यांगांना आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे तरी राज्य परिवहन महामंडळाने पात्र दिव्यांगांना विनाकारण तरास देऊन दिव्यांगाची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी नसता
प्रहार संघटनेच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयावर आंदोलनाचा इशारा प्रहार संघटनेचे अशोक तनपुरे यांनी पत्रकाराशी बोलताना माहिती दिली आहे






