
प्रतिनिधी|जालना
दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी 11:00 वाजता लालदेव फाटा येथे गोर सेना शाखा ओपनिंग ची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित केरण्यात आली होती.या बैठकीस कार्यकर्ते व पदाधिकारी आणि परिसरातील सर्व समाज बांधव हजर होते.तसेच शाखा ओपनिंगचा चा कार्यक्रम गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.त्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केरण्यात आले होते.या बैठकीसाठी लाल फाटा परिसरातील बाजीउम्रद तांडा,वखारी तांडा,पारेगाव तांडा,पारेगाव वाडी तांडा,मानेगाव वाडी तांड-1,मानेगाव वाडी तांड-2,सावंगी तांडा,दहिफळ तांडा,पाहेगाव तांडा,साळेगाव तांडा,उमरी तांडा,निरखेडा तांडा,धांडेगाव तांडा,साळेगाव-इंदिरानगर तांडा या सर्व तांड्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीला मार्गदर्शन अजय चव्हाण यांनी केले.तसेच या बैठकीसाठी लहु चव्हाण(मा.सरपंच),ज्ञानेश्वर राठोड(सरपंच),संजय राठोड(ग्रा.पं.सदस्य),तुकाराम राठोड (पत्रकार),विजय चव्हाण,विकास चव्हाण,शिवाजी चव्हाण,अनिल राठोड,संदीप चव्हाण,अमोल चव्हाण,विनोद पवार,संदीप चव्हाण,अमोल पवार,कैलास राठोड व ईतर अनेक जण उपस्थित होते.






