
प्रतिनिधी|बुलढाणा
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक लढण्यासाठी सामनक जनता पार्टी रिंगणात असुन या बैठकीमध्ये शाहू,फुले,आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,संत सेवालाल महाराज,अण्णाभाऊ साठे या महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून,अभिवादन करण्यात आले.तसेच विचारसरणीला अनुमोदन प्रचार्य अनिल राठोड राष्ट्रीय अध्यक्ष संमनक जनता पार्टी,गोर सेना चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विजय राठोड,सामाजिक कार्यकर्ता रोहिदास राठोड नशिराबाद,कृष्णा आडे दत्तापूर,भोरू महाराज दत्तापूर,डॉ.विनोद राठोड,धनराज राठोड सरपंच विठ्ठलवाडी,दत्तू सरपंच गारखेड,मधुकर चव्हाण शिक्षक गारखेड,बुलढाणा जिल्ह्यातील सामनक जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते समाजातील या बैठकीमध्ये उपस्थित होते.तसेच समनक जनता पक्षाचे अध्यक्ष अनिल राठोड म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे.शेतकऱ्याच्या शेतजमिनी भांडवलशाहीच्या जाळ्यात जाण्याच्या मार्गावर आहे.आरक्षण नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे.दलित,वंचित,शोषित महिला वरील अन्याय,अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून,यांना न्याय देण्यासाठी संमनक जनता पार्टी सक्षम असून,या पक्षाचे ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या बाबीवर पार्टीचे बारकाईने लक्ष आहे.व समनक जनता पक्षाची कार्य पद्धती मांडण्यात यावेळी आली.तसेच आजचा घाणेरड्या राजकारण दूर करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संमनक जनता पार्टी सदैव कार्य करत आहे.यावेळी जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.






