
गिरीराज गिराम |जालना
जालना महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदांसाठी भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आले असून, महापौर पदासाठी वंदना अरुण मगरे तर उपमहापौर पदासाठी राजेश रामभाऊ राऊत यांची निवड करण्यात आली आहे. जालन्याच्या इतिहासात पहिल्या महापौर म्हणन वंदना मगरे यांचे नाव घेतले जाईल. परतू दोंघांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षाचा असनार आहे.त्यानंतर पक्ष दुसर्यांना संधी देऊ शकते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा मनपा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे व भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी जालना येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीस माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, पंचायत राज समितीचे प्रमुख संतोष पाटील दानवे, मनपा निवडणूक प्रचार प्रमुख कैलास गोरट्याल तसेच भाजप जालना महानगर अध्यक्ष भास्करराव पाटील दानवे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अनुसूचित जाती (स्त्री) प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौर पदासाठी तसेच उपमहापौर पदासाठी नियुक्ती करताना दोन्ही पदांचा कार्यकाळ प्रत्येकी १५ महिन्यांचा (सव्वा वर्ष) राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन्ही उमेदवारांच्या नावांना बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांची संमती मिळाल्याने भाजपकडून अधिकृत मान्यता देण्याची विनंती वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.






