HomeNews२२ व्या वर्षी CRPF मध्ये यश; विशाल प्रकाश खरजुले यांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार.

२२ व्या वर्षी CRPF मध्ये यश; विशाल प्रकाश खरजुले यांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार.

प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
जालना तालूक्यातील सिंधी काळेगाव येथील पांढरी वस्तीवरील विशाल प्रकाश खरजुले यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये यश संपादन करून आपल्या गावाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधी काळेगाव येथील पांढरी वस्ती व समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या बाबद सामाजिक कार्यकर्ते गणेश गिराम म्हणाले कि,विशाल खरजुले यांनी अत्यंत कमी वयात CRPF सारख्या देशसेवेच्या सैन्य दलात प्रवेश करून संपूर्ण सिंधी काळेगाव गावाचा गौरव वाढवला आहे. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही, हे विशालने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून भविष्यात गावातील अनेक युवक देशसेवेच्या मार्गावर जाण्यास प्रेरित होतील.असे हि गणेश गिराम म्हणाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विशाल खरजुले यांच्या जिद्द, मेहनत व चिकाटीचे कौतुक केले. ग्रामीण भागातून येऊन थेट CRPF सारख्या देशसेवेसाठीच्या सैन्य दलात निवड होणे हे तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अशा यशामुळे गावातील युवकांना स्पर्धा परीक्षांकडे व देशसेवेकडे वळण्यासाठी नवी दिशा मिळेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना विशाल खरजुले यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय आणि मार्गदर्शकांना दिले. पुढील वाटचालीत देशसेवेसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश भगवान गिराम, गणेश लक्ष्मण गिराम, संजय नारायण गिराम, शकील सय्यद, उद्धव खर्जुले, गणेश खर्जुले, निलेश खर्जुले, सचिन खर्जुले, अमोल खर्जुले, निलेश खर्जुले सह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular