HomeNewsसिंधीकाळेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सिंधीकाळेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.या प्रसंगी सरपंच सुभाष गिराम, उपसरपंच रशीद सय्यद यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भागवत गिराम, जनार्दन गिराम, राम खरजुले, भाऊसाहेब शेवाळे,गणेश गिराम, डॉ. अमोल गिराम, डॉ. अनिल शेवाळे, गणेश गणेश, मोकिंदा गिराम, अंकुश जोगदंड, बाबासाहेब वैद्य, सुनील जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.ध्वजारोहनानंतर उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन व पालन करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे गावात देशभक्तीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular