
प्रतिनिधी | जालना
नुकत्याच झालेल्या जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार यांच्यासह माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांची शनिवारी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.या शिष्टमंडळात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आदींचा समावेश होता.

यावेळी मार्गदर्शन करतांना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे1 म्हणाले की, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालन्यात शिवसेनेने चांगला प्रयत्न केला असून चांगले यश मिळवले आहे.तसेच या सदिच्छा भेटीदरम्यान माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी जालना शहराच्या विकासासाठी निधी देण्याची विनंती केली असता त्यांनी जालना शहरासाठी तात्काळ 3 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला व आगामी काळातही जालना शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होती या निवडणुकीत जरी आपण पराभूत झालो असलो तरी सर्वच पदाधिकारी व नगरसेवकांनी आगामी काळात चांगले काम करून पुढील निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून त्यांनी निवडणुकीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊन जालना शहराच्या विकासासाठी आगामी काळातही आपण कार्य तत्पर राहण्याचे व पराभूतांनी खचून न जाण्याचे आवाहन केले.

यावेळी शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश राऊत, फिरोजलाला तांबोळी, हरेश देवावाले, बाला परदेशी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक दर्शना विजय झोल, पूजा योगेश भगत, दीपक रविशंकर राठोड, कमलेश जगदीश खरे, पूजा दिनेश भगत, दुर्गेश किशनलाल काठोटीवाले, अब्दुल कबीर अजित शेख, सत्यभामा विजय जाधव, संजय पंढरीनाथ डुकरे, निखिल रमेशराव पगारे, उषाताई अशोक पांगारकर, अमोल प्रदीपसिंह ठाकुर यांच्यासह राहुल हिवराळे, अशोक सांबरे, अभिषेक काबलीये, मनोज लाखोले, आदेश कोटेचा, नजीर शेख, सोपान गायकवाड, चंद्रशेखर कोत्ताकोंडा, सचिन झारखंडे, अखिम शेख, लखन कनिसे, देवेंद्र बुंदेले, तृप्ती प्रसन्ना कोठारी, देवेंद्र बुंदेले, विकास शिरसागर, गणेश सरोदे, हर्षद खाकीवाले, रितेश भक्कड, महेश दुसाने, संतोष सिंग ठाकूर शुभम टेकाळे, अब्दुल कुरेशी, राजाराम गायकवाड, संताजी वाघमारे, राधाकिसन दाभाडे, भानुदास धोत्रे, गणेश राऊत, ज्ञानेश्वर सुपारकर, शिवाजी लाड, विशाल बनकर, रंयोगेश रत्नपारखे, शरद ढाकणे, राजू पवार, बबन मगरे, दीपक वैद्य आदींची उपस्थिती होती.





