HomeNewsहातवन येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ओंकारेश्वर शिंगाडे तर उपाध्यक्षपदी पांडुरंग शिराळे

हातवन येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ओंकारेश्वर शिंगाडे तर उपाध्यक्षपदी पांडुरंग शिराळे

प्रतिनिधी|सिंधी काळेगाव

जालना तालुक्यातील हातवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेत शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे कार्य व जबाबदाऱ्या निवडलेल्या सदस्य यांना सांगण्यात आले. शालेय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय समितीचे योगदान,शाळा पातळीवर आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा, मुलांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय,तंत्रज्ञान युक्त शिक्षणासाठी संगणक व प्रोजेकटर वापरा विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.नवीन अध्यक्ष म्हणून ओंकारेश्वर गोपीनाथ शिंगाडे ,उपाध्यक्ष पांडुरंग शिराळे, तर सदस्य सौ सुनीता रामेश्वर खंदारे,सौ भाग्यश्री योगेश शिंगाडे ,अक्रमखा पठाण,सौ आम्रपाली अशोक गंगातिवरे,सौ मनीषा शिवाजी सोंनगावकर, रामदास दामोदर हिवाळे,गणेश सर्जेराव धुमाळ,सतीश प्रकाश हिवाळे सचिव तथा मुख्याध्यापक रमेश चव्हाण व सदस्य सतीश श्रीखंडे यांची निवड करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular