
प्रतिनिधी|मुंबई
हिंदी,मराठी पत्रकार संघ व दैनिक दर्पण वृतपत्र यांच्या वतीने २०२६ साली देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न ‘पुरस्कार मुंबईतील चारकोप येथील लेखक,कवी पत्रकार रवि लिंगायत यांना जाहीर करण्यात आला आहे.रवि लिंगायत हे पत्रकार असून,विविध सामाजिक क्षेत्रात काम करत करतात.गरजूनां दवाखान्याची सोय करणे,तसेच गरीब गरजून्ना मोफत राशन वाटणे.कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अश्या अनेक प्रशशनीय कार्याची दाखल घेत त्यांना सम्यक समता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडून कोरोना योद्धा हा पुरस्कार मिळला आहे.तसेच सातत्याने पत्रकारितेतसुद्धा सामान्य वक्तीस न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात.या विशेष कार्याची दखल घेत मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून यंदाचा राज्यस्तरीय दर्पण रत्न 2026 हा पुरस्काररवी लिंगायत यांना देऊन त्यांना गौरवण्यात आले.या कार्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक करत,अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






