HomeNewsसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रेणुका देवी पतसंस्थेत अभिवादन.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रेणुका देवी पतसंस्थेत अभिवादन.

प्रतिनिधी|जालना

जालना येथील श्री रेणुका देवी नागरी सहकारी पतसंस्था, शाखा अंबड चौफुली येथे थोर समाजसुधारिका यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, महिला सक्षमीकरण व सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी शाखा व्यवस्थापक ओमप्रकाश चाटे यांच्यासह कर्मचारी भूषण कुलकर्णी, निखिल गवते, संजय देशपांडे, अजिंक्य जाधव, कल्पना गव्हाणे, अश्विनी ठक्कर व मेहेक बैजल आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

Most Popular