
प्रतिनिधी |सिंधी काळेगाव
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व बौद्धिक कार्यात सक्रिय योगदान देणाऱ्या रामभाऊ मोहिते यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नियुक्तीपत्र देत ही निवड जाहीर केली आहे.मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत असलेल्या मोहिते यांची कार्यकुशलता, संघटन क्षमता व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पुढील तीन वर्षांसाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील समाजबांधवांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील तसेच संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर मोहिते यांचे विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.दिलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे की, आपण बहुजन समाजाकरीता आध्यात्म आणि वारकरी संप्रदाय चळवळीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलीत त्याबद्दल आपले अभिनंदन.
आपल्या कार्यकाळात बहुजन समाज आणि मराठा समाज यांच्यात वाढत असलेली वैचारीक मतभेदाची दरी दूर करुन आम्ही सारे पांडूरंगाचे वारकरी माऊलीच्या पालखीचे भोई हा विश्वास समाजात निरंतर वाढविण्यासाठी कटीबध्द राहावे हिच आपल्या कडून अपेक्षा. आपल्या कार्यास साधु-संत-वारकरी यांच्या साक्षीने लाख लाख शुभेच्छा या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






