प्रतिनिधी | सिंधी काळेगाव

जालना तालूक्यातील भाटेपुरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने तीव्र भीती निर्मान झाली आहे. अशातच शुक्रवारी शेतात कापूस वेचत असताना महिलांना बिबट्या दिसला.त्याला घाबरून माघे पळत असताना पडल्याने जखमी झाल्या आहेत. रामलिला अंकुश आटोळे असे जखमी मिळेलच नाव आहे. या घटनेमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संग्रहित छायाचित्र.
या बाबद ग्रामस्थांनी दिलेली अधिक माहीती अशी कि, जालना तालूक्यातील भाटेपूरी येथे गट क्र २७६ मध्ये रामलिला आटोळे ह्या स्वतच्या शेतात कापूस वेचनी करत होत्या. दूपारी २ वा. सूमारास सदरील महिलेला बिबट्या बसलेला अवस्थेत असल्याचे दिसले. त्यानंतर बिबट्याला बघून महिला घाबरून पळत असताना पडल्याने जखमी झाल्याची माहीती भाटेपूरी येथील ग्रामस्थ तुकाराम गोरे यांनी सांगितले.सुदैवाने बिबट्याचा थेट हल्ला झाला नसला तरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. वनविभागाने तातडीने दखल घेऊन परिसरात पाळत वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





