
प्रतिनिधी |जालना
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी स्वयंप्रेरनेने चालविलेली संपुर्ण शेती चळवळ हे ब्रीद घेऊन चाललेल्या ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेस आयोजिण्यात येणारे डिसेंबर महिन्यातील नियमित मासिक चर्चासत्र मंगळवारी भोकरदन तालुक्यातील मौजे पळसखेड ( पिंपळे ) येथे अत्यंत उत्साहात पार पडले.
ॲग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जालनाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. प्रशांत पवार, भोकरदनचे तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल शिंदे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. उभयतांनी शासनाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. भोकरदनचे तालुका गुण नियंत्रक श्री. अशोक बिनगे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गजानन कुडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

एसआरटी कडे शेतकर्याचा कल.
पळसखेड पिंपळे येथील श्री. गणेश संतुकराव पिंपळे यांच्या पुढाकारातून गावात किमान पन्नास एक्कर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने शेती केल्या जात आहे. त्या पैकी श्री. ज्ञानेश्वर लहाने, श्री. अमोल पिंपळे, श्री. एकनाथ पिंपळे, श्री. गणेश पिंपळे, श्री. सुदाम पिंपळे, श्री. ज्ञानेश्वर पिंपळे यांच्या एसआरटी शेतीतील मका, कपाशी, आद्रक या शेतावर यावेळी शिवारफेरी करण्यात आली. ही सर्व पिके पाहून उपस्थित शेतकरी समाधान पावले. उपस्थित शेतकऱ्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. गणेश बापू पिंपळे यांनी केले. वन भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी कंडारी बु. चे श्री. ज्ञानेश्वर सिनगारे, अकोला ( देव )चे श्री. सुधीर जोशी, श्री. दत्तात्रय सवडे, श्री. देविदास सवडे, आंबेगावचे श्री. दत्तात्रय देठे, श्री. राम शिनगारे, जैनपूर कोठारा चे श्री. गणेश साबळे, पिंपळगाव थोटे चे श्री. दिनकर थोटे, तपोवनचे श्री. रावसाहेब मालुसरे, श्री. नितेश चव्हाण, चांधई ठोंबरी चे श्री. बाबासाहेब ठोंबरे, पळसखेड पिंपळे चे श्री. अशोकराव पिंपळे, श्री. जनार्दन पिंपळे, श्री. अंकुशराव पिंपळे, श्री. गुलाबराव पिंपळे, श्री. राजू पिंपळे, श्री. ज्ञानेश्वर लहाने, श्री. कौतिकराव पिंपळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.






