
प्रतिनिधी |जालना
जालना जिल्हा पोलीस दलात एकुंण 19 पोलीस ठाणे कार्यारत असुन पोलीस ठाणे हद्दीत खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, दुखापत, जबरी दुखापत, फुस लावुन पळुन नेणे, बलात्कार, आत्महत्यास प्रवृत करणे, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, पोस्को, हंडा बळी, अंमली पदार्थ विरोधी कार्यावाही असे गुन्हे घडत असतात. पोलीस दलाकडून आरोपी विरुध्द घटनास्थळावरील पुरावे गोळा केले जात होते, परंतु पुरावे गोळा करतांना पोलीसांना अडचणी निर्माण होत होत्या.

आता महाराष्ट्र शासनाने जालना जिल्हा पोलस दलासाठी अत्याधुनिक तिन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध करुन दिल्या असून जिल्हयात 24×7 उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध राहणार आहे. सदर मोबाईन फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतीक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्याकरीता किट्स, रसायने व साध सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स हया जिल्हयातील घडणाऱ्या सर्व घटनास्थळी विनाविलंब भेट देऊन आरोपी विरुध्द भौतीक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा केल्याने आरोपीस मा. न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे. तसेच जालना जिल्हा पोलीस दलातील उप विभाग जालना, भोकरदन व परतूर या 03 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स मिळालेल्या आहे. सर्व मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स हया उप विभागा प्रमाणे कार्यरत असणार असुन त्यावर उप विभागीय पोलीस अधिकारी हे देखरेख ठेवणार आहे.






