प्रतिनिधी |जालना
बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयाला महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दि.०७/१२/२०२५ रोजी सायंकाळी भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवांची सविस्तर पाहणी केली. आपत्कालीन सेवा, स्वच्छतेची स्थिती, विविध विभागांचे कामकाज तसेच यंत्रसामुग्रीची कार्यस्थितीची त्यांनी पाहणी करुन मार्गदर्शन केले.

राज्याचे सासार्वजनि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ७ रोजी बदनापूर च्या ग्रामीन रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधत उपचारांची उपलब्धता, सुविधांची गुणवत्ता आणि सेवा वेळेवर उपलब्ध होते का या बद्यल रुग्णांशी संवाद साधला व सेवा बाबत समाधान जाणुन घेतले. अधिक सक्षम आणि गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांना आवश्यक त्या सुचनाही देण्यांत आल्या.
यावेळी बदनापुरचे आमदार नारायण कुचे, सुनिता गोलाईत, सहसंचालक, डॉ.कांचन वानेरे उपसंचालक, डॉ.राजेंद्र पाटील जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ.जयश्री भुसारे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.जी.डी.म्हस्के, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शितल सोनी निवासी वैद्यकिय अधिकारी बाहय संपर्क, डॉ.इरफान शेख, अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.






