प्रतिनिधी |सिंधी काळेगाव

राज्यातील लाडक्या बहिनांना महायूती सरकारने सूरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यभरात सुरू असून पात्र लाभार्थीना दिलासा देत राज्य सरकारने योजनेतील ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र विविध अडचणींमुळे अनेक लाभार्थीना वेळेत ई-केवायसी करता आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अद्याप ई-केवायसी न केलेल्या सर्व पात्र भगिनींनी विस्तारित मुदतीचा लाभ घेऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन जालना येथील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे सदस्य संतोष ढेंगळे यांनी केले आहे.






