.
प्रतिनिधी|जालना
जालना तालुक्यातील देवमूर्ती जिल्हापरिषद सर्कल उमेदवारीसाठी देवमुर्ती येथील कृष्णा जाधव यांनी २७ नोव्हेंबर रोजी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दाखल केला. या वेळी माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.कृष्णा जाधव यांनी माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर व शिवसेना संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर व युवासेना महाराष्ट्र राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांच्या आशिर्वादाने इच्छुक फॉर्म भरलेला आहे.देवमुर्ती जिल्हापरिषद सर्कल आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीसाठी कृष्णा जाधव यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृत अर्ज दाखल केला आहे.शिवसेनेने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविल्यानंतर कृष्णा जाधव यांनी पुढाकार घेत अर्ज सादर केला आहे. तसेच पक्ष मला संधी देईल असा विश्वास कृष्णा जाधव यांनी व्यक्त केला.शिवसेनेकडून उमेदवारी अर्जाची मागणी होताच कृष्णा जाधव यांनी दाखल केलेल्या या अर्जामुळे देवमुर्ती सर्कल मधील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.आगामी काही दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून अंतिम उमेदवाराचा निर्णय जाहीर होणार असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसुन येत आहे.








