प्रतिनिधी |जालना
जालना लना तालुक्यातील टाकरवन येथे श्री गुरु रंगनाथ महाराज शिष्य श्री सदानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टाकरवन नगरीत दत्त जयंती निमीत्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. टाकरवन येथे गेल्या १२५ वर्षांच्या परंपरेनुसार दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आहे.यामध्ये काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, सदानंद महाराज चरित्र, रामायण, हरिपाठ आणि हरीकिर्तन असे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.तर रात्री ९ते११ या वेळेस हरी किर्तन होते.या किर्तन सोहळ्याला विविध नामवंत किर्तनकार हजेरी लावणार आहे. नामदेव महाराज ढवळे, चारठाणकर, गोविंद महाराज अवचार, विडोळी, दत्ता महाराज आनंदे, मासेगाव, अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, नाना महाराज पोखरीकर , बाबुराव महाराज काळे, ताडशिवनी, आनंदे महाराज, दौलताबाद, चांगदेव महाराज काकडे, कंडारी (दत्तजन्म किर्तन)अशोक महाराज गवंडर, सिताराम महाराज रोडगे, दत्तजन्म दिनी विशेष किर्तन सोहळ्यानंतर श्री दत्त पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यामुळे पंचकोशितील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गावांतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे पंच देवस्थान कमिटीने आवाहन केले आहे.








