प्रतिनिधी |जालना
जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली वखारी येथील ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कूल येथे मुली व महिलांच्या सुरक्षा,स्व-सरंक्षण, बालसरंक्षण मूलभूत मार्गदर्शन,अमली व नशेचे पदार्थ याविषयी जनजागृती,POCSO कायदा जनजागृती या करिता एक दिवसीय सेल्फ डिफेन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे सचिन इंगेवाड (API) जालना, संस्थेचे अध्यक्ष भगवानराव खैरे,यासीन दस्तगीर (PSI ) जालना,अक्तर शेख (ASI), जालना, प्राचार्य अण्णाभाऊ भालमोडे,शिवारकर साहेब,कुरेवार साहेब,गौतम बोबडे,रामेश्वर देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.शिबीरा दरम्यान मुली व महिला यांना आपल्याकडील साहित्याचा वापर करुन स्वतःचा व इतरांचा बचाव किंवा संरक्षण कशाप्रकारे करायाचे व सायबर क्राईम बाबत माहिती देण्यात आली तसेच तात्काळ पोलीस सेवेचा वापर त्यामध्ये डायल 112 व 1930 बाबत माहिती देण्यात आली व प्रात्याक्षिक (डेमो) स्क्रीन वॅन वर दाखविण्यात आले.कार्यक्रमामध्ये 400ते 500 मुलींनी सहभाग नोंदवीला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन इंगेवाड (API ) यांनी सांगितले की,सदर शिबिर खास मुली व महिलांसाठी तयार करण्यात आलेले आहे. मुली व महिलांनी आचानक आलेल्या संकटाला सामोरे जाताना टेक्नीक चा वापर करुन स्वतःचे रक्षण करायाचे आहे.दामिनी पथक व इमर्जन्सी सेवा तात्काळ तुमच्या मदतीला धावुन येतील,जिल्हयात कुठेही छेडछाड प्रकार किंवा अतिप्रसंगी घडु नये घडल्यास योग्य वेळी सेल्फ डिफेन्स चा वापर करावा.तसेच मुली व महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी आम्ही नेहमीच तुमच्या संरक्षणासाठी तत्पर आहोत असे सांगुन मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे सचिन इंगेवाड,अध्यक्ष भगवानराव खैरे,प्राचार्य अण्णाभाऊ भालमोडे तसेच मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सुत्रसंचालन सय्यद गौसिया सय्यद यांनी केले तर आभार हरिष खराडे यांनी केले.

Time for an adventure
Explore our network of trails that lead through a variety of woodland habitats and observe the diverse flora that call this area home.











