प्रतिनिधी | सिंधी काळेगाव

केंद्रीय प्राथमिक शाळा सावंगी तलाव केंद्र सावंगी येथे DIET जालना यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख जेठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद घेण्यात आली. पी डी पवार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा,निपुण महाराष्ट्र,विद्यार्थी सुरक्षा, यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांची निपुण महाराष्ट्र या ॲपवर नोंद करण्यात आली व त्यांचे वर्ग जोडण्यात आले.

प्रशांत भुरे सर यांनी सकारात्मक शिस्त याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कडक शिस्त न देता मूल्यवर्धन सारखे उपक्रमाद्वारे सकारात्मक स्वयंशिस्त निर्माण करून आनंददायी वातावरण वर्गामध्ये निर्मिती करणे, विद्यार्थ्यांना मूल म्हणून समजून घेणे , त्यांना प्रेमाने चुका निदर्शनास आणून देणे, त्यात सकारात्मक बदल घडवून आणणे याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले. केंद्र प्रमूख जेठेवाड सर यांनी संचमान्यतेच्या सर्व बाबी पूर्ण करून घेतल्या. ग्रामपंचायत कडून अथवा सहभागातून शाळेमध्ये ट्यूबलाईट फॅन व सीसीटीव्ही तात्काळ बसून घ्यावे , विद्यार्थी सुरक्षा कायदा अंतर्गत अंमलबजावणी करावी.
शिष्यवृत्ती परीक्षा ,एन एम एम एस परीक्षा प्रश्नपत्रिका सराव विद्यार्थ्याकडून घ्यावा. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या आदेशानुसार दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शाळेच्या वेळेत पंचायत समिती जिल्हा परिषद या ऑफिस कडे वैयक्तिक कामानिमित्त शिक्षकांनी जाऊ नये. एमडीएम उपस्थिती, व्ही एस के उपस्थिती नियमित भरावी,माजी विद्यार्थी संघ मेळावा घेऊन शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत पूर्ण माहिती भरून आपला सहभाग शाळेने नोंदवावा. सर्व मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये शालेय पोषण आहार मेनू नुसार देऊन त्यामध्ये भाजीपाल्याचा वापर करावा व पूरक आहार वाटप करावा. शाळेची वेळ पाळावी. विद्यार्थी सुरक्षा कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणते शिक्षा करू नये. इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस केंद्रीय मुख्याध्यापक प्रमोद पवार,नारायण माहोरे,गणेश भुतेकर,प्रशांत भुरे, गोविंद मदिलवाड,सत्यव्रत लोखंडे,किशन ईरमले,बाबाबासाहेब गायकवाड, बंडू गिराम,गंगाधर होनवडजकर, हुसेन, रमेश रुद्रे,केकाण,राजू सदावरते,बुंदे,काळे,श्रीमती संगीता चव्हाण,अर्जुन निकम,मनोहर खुडे,अशोक गुहाडे,प्रमोद साठेवाड यांनी प्रसंगी केंद्रातील सर्व शिक्षक बंधू उपस्थित होते.







