Homeशैक्षणिकसोमनाथ येथील कु. कोमल एखंडे यांची BAMS साठी निवडीबद्दल राजेश पवार यांच्या...

सोमनाथ येथील कु. कोमल एखंडे यांची BAMS साठी निवडीबद्दल राजेश पवार यांच्या हस्ते सत्कार.

सोमनाथ येथील कन्येने वैद्यकीय क्षेत्रात मिळवले उज्ज्वल यश.

प्रतिनिधी | सिंधीकाळेगाव

जालना तालुक्यातील सोमनाथ (सद्गुरू नगर) येथे गावाच्या शैक्षणिक अभिमानात भर घालत कु. कोमल कैलास एखंडे यांची AMC मेडिकल कॉलेज, नालासोपारा, मुंबई येथे BAMS अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल माजी सरपंच तथा पिरकल्याण सर्कलचे भावी जिल्हा परिषद सदस्य राजेश भाऊ पवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी सोमनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच वसंत हानुते, उपसरपंच संजय एखंडे, शिवहारी एखंडे, नायब तात्या एखंडे, प्रल्हाद नाना भुतेकर, परमेश्वर एखंडे, किसनराव काळे, भानुदास काळे, पंडीत दादा गाढे, विठ्ठल दादा एखंडे, भाऊसाहेब एखंडे, सुधाकर उगले, कृष्णा जिजा एखंडे, बळीराम बापू एखंडे, कैलास काका एखंडे, लक्ष्मण एखंडे, सुरेश एखंडे,पत्रकार बाबासाहेब रायमल , नंदू एखंडे, भरत एखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गावातील कन्येने वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचे वातावरण असून, कोमल एखंडे यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular