प्रतिनिधी |जालना
जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील दत्त मंदिरावर दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणार्या या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव येथील दत्त मंदिरावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये गायत्री होमहवन, सीताराम महाराज चरित्र ग्रंथाचे पारायण,दिगंबरा नामस्मरण, दत्तमाला महामंत्राचे आवर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दत्त जयंती निमित्त ४ डिसेंबर रोजी वेदान्तचार्य गणेश महाराज कोल्हे यांचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्यामुळे पंचकोशितील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.







